मुंबई : दहीहंडीची मर्यादा 20 फुटावर आणली, आता काय स्टुलावरुन हंडी फोडायची का, असा सवाल उपस्थित करुन राज ठाकरे म्हणालेत, प्रत्येकबाबतीत कोर्टाने ढवळाढवळ करु नये. मराठी सण असले की निर्णय घेतले जातात. अन्य सणांसाठी मुभा का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहीहंडीत गोविंदा पथकांत लहान मुलांना सामावून घेतात जे चुकीचंच आहे, ते थांबलंच पाहिजे. माझा आक्षेप थरांच्या मर्यादेवर आहे. कोर्टाने दहीहंडी मंडळांची बाजू ऐकून घेऊन जर आचारसंहिता आखून दिली असती तर ठीक होतं पण ते न करता परस्पर निर्णय देताच कसे?, असा सवाल राज ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत उपस्थित केला.


दहिहंडीच्या वेळीच ध्वनी प्रदूषण दिसतं, पण मशिदीवरील स्पिकर चालूच ठेवता ते चालतं का? दहीहंडीत काही गैरप्रकार आहेत ते टाळायला हवेत हे मान्य, पण हिंदू धर्माच्या सणांमध्ये कायम काही आक्षेप काढायचे याला काय अर्थ आहे, असे राज ठाकरे म्हणालेत.


अनेक दहीहंडी मंडळं सुरक्षेच्या उपायांची पूर्ण काळजी घेतात, त्याप्रमाणे इतर मंडळांना सुरक्षा उपाय सक्तीचे करावेत. दरम्यान, दहीहंडी हा सण आहे, साहसी खेळाचा दर्जा देण्याचा प्रयत्न कशाला? अपघात सगळीकडे होतात, मग रस्ते बंद करणार का, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.