मुंबई : आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे. त्याचवेळी रस्त्यावरील पडणारे खड्डे यावर बोट ठेवत तुम्ही रस्ता कर कशासाठी वसूल करता, असा थेट प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. त्याचवेळी महाराष्ट्रातल्या सोयी-सुविधांचा फायदा मराठी माणसालाच मिळायला हवा, अशी आग्रही भूमिका राज यांनी पत्रकार परिषदेत मांडली.


पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- रस्ते, फुटपाथ हे खड्ड्यात घातलेत आणि तरीही तुमच्याकडून रोड टॅक्स वसूल केला जातो. आणि इतके खराब रस्ते असून देखील त्यांनाच मतदान कसं होते?


- मराठी मुलांना जर नोकऱ्या मिळणार नसतील तर मग मी का नाही बोलायचे, प्रत्येक वेळेला मतपेटीचा विचार करत बसणार आहेत का हे सरकार? 


- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही, विनोद तावडेंनी केवळ गाजावाजा केला 


- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अद्याप मिळालेला नाही. त्यायाबाबत केंद्राकडे पाठपुरावाही झालेला नाही. 


- मराठी भाषेला अभिजात दर्जेचा भाषा मिळावा यासाठी मनापासून प्रयत्न करावेत, अशी सूचना मी मुख्यमंत्री महोदयांना केली 


- झारखंड राज्याने अवलंबलेली डोमेसाईल पॉलिसी आणा, मोफत घरांच्या योजनेचा फायदा परप्रांतियानाच  


- महाराष्ट्रात डोमिसाईल सर्टिफिकेट सक्तीचे हवे, जेणेकरून मराठी तरुणांना प्राधान्य मिळेल 


- महाराष्ट्राने अधिवास धोरण जाहीर करावे 


- नाशिक महापालिकेचे १९० कोटी रुपये राज्यसरकारकडे अडकले आहेत ते आम्हाला मिळायला हवे, ही माझी मागणी आहे 


- आयटी कंपन्यांना करात सवलती द्यायच्या, जागा नाममात्र द्यायच्या आणि तरी यांत मराठी मुलांना तुम्ही नोकऱ्या देणार नसाल तर काय उपयोग?


- महाराष्ट्रातल्या सोयी-सुविधांचा फायदा मराठी माणसालाच मिळायला हवा


- प्रत्येक गोष्टीत न्यायालयाने नाक खुपसू नये - राज ठाकरे