राजू शेट्टींनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट
शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली.
मुंबई : शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली.
या भेटीत शेतकरी कर्जमाफी, समृद्धी महामार्ग आणि आदिवासींच्या जमिनीच्या समस्येवर चर्चा करण्यात आली.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राजू शेट्टी मातोश्रीवर गेले.