मुंबई : तुझ्यात जीव रंगला ही झी मराठीवरची मालिका थोडक्याच दिवसांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील राणादा आणि पाठक बाईही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या आहेत. राणादा म्हणजेच हार्दिक जोशी यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर जाऊन राणादानं राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमध्ये दोघांनी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. हार्दिक जोशी हा मुंबईचा आहे. कॉलेजमध्ये असल्यापासून मला राज ठाकरेंची  बोलण्याची स्टाईल आणि त्यांचं राहणीमान आवडत असल्याचं हार्दिक म्हणाला आहे. मी तुमचा फॅन असल्याचंही हार्दिकनं राज ठाकरेंना सांगितलं.