`सैराट` सारख्या चित्रपटाने रेप वाढताहेत - मनिषा चौधरी
सैराट सारखे सिनेमामुळं मुलं बिघडतायेत बलात्काराच्या घटना वाढतात त्यामुळं सैराट सारख्या सिनेमावर बंदी घाला, अशी विचित्र मागणी
मुंबई : सैराट सारखे सिनेमामुळं मुलं बिघडतायेत बलात्काराच्या घटना वाढतात त्यामुळं सैराट सारख्या सिनेमावर बंदी घाला, अशी विचित्र मागणी भाजपा आमदार मनिषा चौधरी यांनी केली आहे.
विधानसभा कोपर्डी बलात्कार प्रकरणाची चर्चा असतानाच मनिषा चौधरी यांनी हे विधान केलं आहे. इतकंच नाही तर ‘सैराट’सारख्या सिनेमांवर बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली. कोपर्डीतील आरोपींना कडक शिक्षेची तजवीज करण्याऐवजी मनिषा चौधरींनी अजब विधान केलं आहे.
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सौदी अरेबियात ज्याप्रमाणे शिक्षा दिली जाते, तशीच द्यावी. बलात्कारानंतर खटला चालेल, दोषीला शिक्षा होईल, ही प्रक्रिया मोठी आहे. त्यामुळे महिला-मुलींवर बलात्कार झाला की तातडीने नराधमाचे हात तोडले पाहिजेत, असे भाजप आमदार प्रशांत बंब म्हटले.