मंत्रीमंडळातील या मंत्र्यांना मिळणार डच्चू
मंत्रीपद मिळूनही खराब कामगिरी करणाऱ्या ५ ते ६ मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात विष्णू सावरा, राजकुमार बडोले, बबनराव लोणीकर, राजे अंबरिश आत्राम, विद्या ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मंत्रीपद मिळूनही खराब कामगिरी करणाऱ्या ५ ते ६ मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात विष्णू सावरा, राजकुमार बडोले, बबनराव लोणीकर, राजे अंबरिश आत्राम, विद्या ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे.
येत्या १५ दिवसात या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. यात मंत्रीमंडळातील कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कामगिरीवर होणार बदल होण्याची शक्यता आहे.
तसेच खांदेपालट करताना जात आणि विभागनिहाय समतोल साधत नव्या चेह-यांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कोअर कमिटी संदर्भात चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.