रिक्षा चालकांची मुजोरी कायम; चालकाकडून प्रवाशाला मारहाण, त्यानंतर उद्रेक
शहरातील रिक्षा चालकांची मुजोरी ही नेहमीच याना त्या कारणाने समोर येत असते. परंतु आज कमी अंतराची भाड़ी नाकारणाऱ्या आणि प्रवाशांशी उद्धटपणे वाग्णाऱ्या रिक्षा चालकांविरोधात प्रवाशांच्या भवनांचा उद्रेक झाला आणि घाटकोपर मध्ये त्याला हिंसक वळण लागले.
मुंबई : शहरातील रिक्षा चालकांची मुजोरी ही नेहमीच याना त्या कारणाने समोर येत असते. परंतु आज कमी अंतराची भाड़ी नाकारणाऱ्या आणि प्रवाशांशी उद्धटपणे वाग्णाऱ्या रिक्षा चालकांविरोधात प्रवाशांच्या भवनांचा उद्रेक झाला आणि घाटकोपर मध्ये त्याला हिंसक वळण लागले.
घाटकोपर रेल्वे स्थानकासमोर उभ्या असलेल्या रिक्षा चालकाने भाडं नाकारल्याने झालेल्या वादात प्रवासी मल्लेश मणी गौडा या प्रवाशाला चार ते पाच रिक्षा चालकांनी बेदम मारलं. ही मारहाण पाहून प्रवाशांच्या भावनांचा उद्रेक झाला. त्यांनी या रिक्षा चालकांच्या रिक्षाच फोडून उलट्या करून टाकल्या.
प्रवाशाचं हे रुद्र रूप पाहून रिक्षा चालकांनी त्या ठिकाणावरून पळ काढला. दरम्यान प्रवासी मल्लेशच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.