मुंबई : पॉप सिंगर रॉकस्टार जस्टीन बीबर याचे मुंबईत आगमन झाले आहे. आज नवी मुंबईत त्याचा गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे तिकीट 70 हजार रुपये इतके आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉकस्टार जस्टीन बीबर याचा म्युझिक कॉन्सर्ट नेरूळमधील डी. वाय. पाटील स्टेडियम येथे रंगणार आहे.  नवी मुंबईतील डी. वाय पाटील स्टेडियममध्ये होणा-या या कॉन्सर्टची तमाम फॅन्समध्ये उत्सुकता आहे. त्याचबरोबर बॉलिवूड इंडस्ट्रीचे अनेक सेलिब्रिटीही या कॉन्सर्टला आवर्जून हजेरी लावणार आहेत. 


जस्टीनच्या पर्पल वर्ल्ड टूर अंतर्गत होणा-या या कॉन्सर्टला सलमान खान, शाहरुख खान या बड्या स्टार्सबरोबरच इतरही अनेक बडे उद्योगपती आणि स्टार्स ही कॉन्सर्ट अनुभवण्यासाठी  उत्सुक आहेत.


25 डान्सर्ससोबत तब्बल 90 मिनिट जस्टीन बिबर परफॉमन्स करणार आहे. तर जस्टीनचा पाहुणचार करण्यासाठी अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खानमध्ये चढाओढ लागली आहे.