मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलीय. सदाभाऊ खोत यांच्यासारखा शेतकरी नेता भाजपमध्ये यावा म्हणून भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपकडे वळण्यासाठी सदाभाऊंची सांगलीत ताकद वाढवण्याची भाजपची खेळी आहे. त्यापार्श्वभूमीवरच त्यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता खात्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्याचीही चर्चा रंगलीय. 


तर केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशानेच अशी माहिती काही लोकांकडून पसरवली जात असल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केलाय.