मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. सदाभाऊ खोत यांच्यासारखा शेतकरी नेता भाजपमध्ये यावा म्हणून भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपकडे वळण्यासाठी सदाभाऊंची सांगलीत ताकद वाढवण्याची भाजपची खेळी आहे. त्यापार्श्वभूमीवरच त्यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता खात्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्याचीही चर्चा रंगली आहे. तर केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशानेच, अशी माहिती काही लोकांकडून पसरवली जात असल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केला आहे. 


दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांनीही याबाबत पसरवलेलं वृत्त चुकीचं असल्याचं  झी 24 तासला फोनवरून सांगितले. मात्र, सदाभाऊ खोत यांनी भाजपाप्रवेशाच्या बातम्या निराधार असल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती फेटाळून लावली आहे.  
 
तर दुसरीकडे, आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आणि त्यांच्या आदेशानुसारच काम करायचे आहे, असेही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. राज्याच्या हितासाठी सरकार जी जबाबदारी देईल ती पार पाडणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.