मुंबई : साध्वी प्रज्ञाला ब्रेस्ट कॅन्सर आहे, तिला शस्त्रक्रियेची गरज असल्याचं कारण तिच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टाला दिले आहे. साध्वीने कोर्टाकडे जामिनासाठी अर्ज केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साध्वी प्रज्ञा सिंह मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीने आहे, जामिनासाठी तिने हायकोर्टात धाव घेतली आहे. 


मुंबई विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंहला जामीन नाकारल्यानं साध्वीच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. सध्या साध्वी प्रज्ञा सिंह भोपाळच्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.


मालेगावमध्ये २००८ साली बॉम्बस्फोट झाले होते, त्या प्रकरणात साध्वी आरोपी आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एटीएसच्या चार्जशीटनंतर मुंबई विशेष न्यायालयाने साध्वीवर मोक्का लावला होता. मात्र सुप्रीम कोर्टानं साध्वीला दिलासा देत तिला मोक्का लावण्यापुरते पुरावे नसल्याचं सांगितलं आहे.