आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा पगार किती आहे?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना दोन लाखपेक्षा जरा जास्त पगार आहे. आरबीआयकडून त्यांना कोणताही सपोर्ट स्टाफ देण्यात आलेला नाही.
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना दोन लाखपेक्षा जरा जास्त पगार आहे. आरबीआयकडून त्यांना कोणताही सपोर्ट स्टाफ देण्यात आलेला नाही.
नोटबंदी दरम्यान आरबीआय गव्हर्नरवर जोरदार चर्चा सुरू असताना, याविषयावर आरटीआय दाखल करण्यात आली होती.
पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, उर्जित पटेल यांना २ लाखांपेक्षा जास्त पगार असल्याचं आरटीआयमधून समोर आलं आहे.
आरबीआयने आरटीआयचं उत्तर देताना म्हटलं आहे, सध्या गव्हर्नर यांच्या घरी कोणताही सपोर्ट स्टाफ देण्यात आलेला नाही, त्यांना दोन कार आणि दोन गाडीचे ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत.
या माहितीनुसार उर्जित पटेल यांना ऑक्टोबर महिन्यात २ लाख ९ हजार पगार होता. हा पगार माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या बरोबरीचा आहे.
रघुराम राजन यांनी ५ सप्टेंबर २०१३ रोजी आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा कार्यभार सांभाळला होता. तेव्हा त्यांचा पगार १ लाख ६९ हजार रूपये होता. या वर्षभरात तो पगार वाढून २ लाख ६९ हजारांवर आला होता.
उर्जित पटेल यांना कोणत्या आधारावर गव्हर्नर निवडण्यात आलं आहे, या बाबतीत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही माहिती देण्यास नकार देताना म्हटलं आहे की हे कॅबिनेट पेपर्स आहेत, ज्यांना सार्वजनिक करता येणार नाही.