मुंबई :  बॉलिवूड अभिनेता सलमान खान आता मुंबई हागणदारीमुक्त अभियानाचा ब्रँड अँबेसिडर झाला आहे. यासंदर्भात सलमानने मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची पालिका मुख्यालयात भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते. सलमान खान आणि त्याच्या ह्यूमन बिईंग संस्थेच्यावतीने पाच मोबाईल टॉयलेटही पालिकेला देण्यात आले. हे टॉयलेट बँडस्टँड परिसरात बसवले जाणार आहेत.


मुंबई महापालिकेने स्वच्छ भारतअंतर्गत स्वच्छ मुंबई करण्यासाठी हागणदारीमुक्त मुंबईचे ध्येय ठेवलंय, या स्वच्छ मुंबईसाठी बिईंग हयुमन मार्फत सलमान खान सहभागी झाला आहे. यासाठी सलमानने पालिकेला स्वत:च्या संस्थेमार्फत मोबाईल टॉयलेटही दिले आहेत. 


मी बँन्डस्टँडला राहतो, तिथले रहिवाशी उघड्यावर शौच करताना पाहून वाईट वाटायचे. हे बंद होणं गरजेच आहे. पण त्यांच्याकडे शौचालय नाहीत म्हणून मी पालिकेच्या या अभियानात सहभागी होत आहे. मोबाईल टॉयलेट देत पालिका आणि स्वच्छ भारत अभियानात सहभागी झालोय, असे समलान खानने म्हटले.


 आपला परिसर आणि देश मुंबई स्वच्छ राहिला पाहिजे म्हणून मी मुंबईकर आहे, हे माझं कर्तव्य पार पाडत आहे. मी फोटो सेशन करण्यासाठी आलेलो नाही. परदेशात पहा कशी स्वच्छता असते. लोकांनी मानसिकता बदलून शौचालयाचा वापर करावा हे माझं मत आहे, असे सलमान म्हणाला.