मुंबई : नवी मुंबईत शिवसेनेचे मुखपत्र दैनिका सामनावर हल्ला झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिली आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संयमाने वागावं, अशी सूचना संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनावर झालेला हल्ला हा संतापातून झाला असल्याचं संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे, तसेच जर हल्ला करणारे हे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे असतील तर त्यांची आम्ही जबाबदारी स्वीकारू असंही संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे.


सामना दैनिकात श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी काढलेलं एक वादग्रस्त व्यंगचित्र छापून आल्यानंतर वातावरण तापलं आहे, अनेक ठिकाणी सामना दैनिकाचे अंक जाळण्यात आले आहेत, तसेच ठाण्यात सामना दैनिकाच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तींनी शाई फेकली आहे. तर नवी मुंबईत सामना कार्यालयावर दगडफेक केली आहे.


यावरून संभाजी ब्रिगेडने तरूणांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.