भुजबळांना जामीन मंजूर पण मुक्काम जेलमध्येच
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना दिलासा मिळालाय. एसीबीच्या गुन्ह्यात छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना जामीन मंजूर झाला आहे. विशेष एसीबी न्यायालयानं हा जामीन मंजूर केलाय. मात्र इतर आरोप असल्यामुळं काका-पुतण्याचा जेलमध्येच मुक्काम असणार आहे.
मुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना दिलासा मिळालाय. एसीबीच्या गुन्ह्यात छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना जामीन मंजूर झाला आहे. विशेष एसीबी न्यायालयानं हा जामीन मंजूर केलाय. मात्र इतर आरोप असल्यामुळं काका-पुतण्याचा जेलमध्येच मुक्काम असणार आहे.
इतर गुन्ह्यांमुळे मुक्काम जेलमध्येच
भुजबळ काका पुतण्यांवर पैशाच्या अफरातफरीसंदर्भात अंमलबजावणी संचलनालयाने गुन्हे दाखल केले आहेत. त्याप्रकरणात दोघेही न्यायलयीन कोठडीत आहेत. जोपर्यंत ईडीच्या कोर्टातून जामीन मिळत नाही, तोपर्यंत त्यांची सुटका होणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना विशेष एसीबी न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला असला तरी इतर गुन्ह्यांमुळे त्यांचा मुक्काम जेलमध्येच असणार आहे.