मुंबई : बॉलीवूड अभिनेता संजय दत्तची गुरुवारी येरवडा तुरुंगातून सुटका होतेय. २५ फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास संजय तुरुंगाबाहेर येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, जेव्हा तो तुरुंगाबाहेर येईल तेव्हा जेलमध्ये कमावलेले ४४० रुपये त्याच्याक़डे असतील. रिपोर्टनुसार, संजय दत्तने तुरुंगात केलेल्या कमाईपैकी ४४० रुपये त्याच्याकडे उरलेत. 


१२ मार्च १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अवैधरित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा झाली होती.