मुंबई : स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्डाचं बिल दोन हजारापेक्षा कमी असेल, तर हे बिल भरताना चेकचा वापर करू नका. कारण दोन हजारापेक्षा कमी रकमेचा चेक भरल्यास एसबीआय कार्ड कंपनी तुम्हाला 100 रुपये दंड आकारण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक एप्रिलपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी हा नियम लागू केल्याचा कंपनीचा दावा आहे.


कंपनीचे 90 टक्के ग्राहक सध्या इलेक्ट्रोनिक पद्धतीनं बिलाचं पेमेंट करतात. उरलेल्या ग्राहकांनीही याच पद्धतीला प्राधान्य द्यावं यासाठी हा निर्णय घेतल्याचं कंपनीचं म्हणणे आहे.