मुंबई :  कॅशलेस व्यवहारांमुळे व्यवहार स्वच्छ आणि पारदर्शक झाले, असा टोला शरद पवार यांनी लगावला, कॅशलेस सिस्टममुळे दैनंदिन खर्चावर नियंत्रण आलं, तसेच यामुळे सर्वसामान्यांची लूट थांबली, असं पवारांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पत्नी म्हणते पैसे कशाला हवेत? कार्ड घेऊन जा! पण खिशात काही नसलं कि चैन पडत नाही. गावाकडे कुठं कार्ड दाखवणार? पण हळूहळू एकही क्षेत्र असं राहणार नाही, ज्यातून कॅशलेस व्यवहार होणार नाहीत.' असं शरद पवार, कॅशलेस सिस्टमचं कौतुक करताना म्हणाले.


मुंबईत यशवंतराव चव्हाण यांची १०४ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अनिल काकोडकर, आमदार हेमंत टकले आणि शरद काळे आदी मान्यवर उपस्थीत होते.


या कार्यक्रमावेळी यंदाचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०१६  नंदन निलेकणी यांना शरद पवार यांच्या हस्ते  देण्यात आला.