मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपचा विरोधी पक्ष असला तरी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५०० आणि १००० रूपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला. या निर्णयाचं राष्ट्रवादीने स्वागत केलं आहे. शरद पवारांनी ट्विटवर त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.


 शरद पवारांनी म्हटलं आहे, '५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. यामुळे काळ्या पैशाला आळा बसेल आणि दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा बंद होईल.'