अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : बहुचर्चित शीन बोरा हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्याच्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे, त्या तपास अधिकाऱ्याचा मुलगा अजूनही बेपत्ता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या सांताक्रुज पश्चिम भागातील जी के पार्क या इमारतीतील ए विंगच्या फ्लॅट नंबर ३०३ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गानोरे राहतात. काल रात्री कामावरुन घरी आल्यावर त्यांनी घराची बेल वाजवली. 


बराच वेळ  बेल वाजूवूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. हातानं दरवाजा ठोकूनही काहीच उपयोग होत नसल्यानं गणोरेंनी दरवाजा तोडला. 


 घरात त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं समोर आलं. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असुन गानोरे यांचा मुलगा आणि घरातील एक सदस्य बेपत्ता असल्याचे लक्षात आले. त्या दोघांचे फोन ही बंद आहेत.