मुलुंड : शिवसेना कार्यकर्त्यांनी किरीट सोमैय्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलाय. यावेळी शिवसेना भाजप कार्य़कर्ते एकमेकांना भिडले. रावण दहनाच्या कार्यक्रमा दरम्यान हा प्रकार घडला.


मुंबई महापालिकेच्या माफिया रावण दहनाचा कार्यक्रम सोमय्यांनी आयोजित केला होता. या प्रकारामुळं चिडलेल्या शिवसैनिकांनी तिथं जाऊन सोमय्यांना जाब विचारला. तसंच भाजप कार्यकर्त्यांना जोरदार धक्काबुक्कीही केली. सोमय्यांनी अलिकडेच ठाकरे कुटुंबियांचं थेट नाव न घेता, महापालिकेतल्या भ्रष्ट कारभारावर टीका केली होती. मुंबई महापालिका हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनलाय, असा भडीमार सोमय्यांनी केला होता.