मुंबई : शिवसेना-भाजपमधला संघर्ष शिगेला पोहोचलाय. भाजप नेते माधव भांडारींच्या मनोगताने शिवसेनेचा जळफळाट झाला. हवं तर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार चालवा, असा थेट इशारा शिवसेनेने देताच भाजप बॅकफूटवर आली.


दरम्यान, भाजप आणि शिवसेना नैसर्गिक मित्र असून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांच्या नेत्यांचा आदर राखला पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. कोणाचं मनं दुखावणार नाही याचीही काळजी घ्यावी असंही दानवेंनी म्हटले आहे.