मुंबई : सालाबादप्रमाणे संसदेच्या अधिवेशनाच्या आधी होणाऱ्या बैठकीत युती तुटल्यावर प्रथमच शिवसेना आणि भाजपचे खासदार आमने-सामने येणार आहे. पण बैठकीला शिवसेनेचे खासदार जाणार की नाही याबद्दलचा निर्णय अजूनही झालेला नसल्याचं सूत्रांनी म्हटलंय.


३१ तारखेला संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशऩ सुरू होत आहे. उद्धव ठाकरेंनी काल युती तुटल्याची घोषणा केल्यावर पण या बैठकीला यंदा मात्र विशेष महत्व प्राप्त झालं आहे. या बैठकीत सर्वपक्षीय खासदार उपस्थित राहणं अपेक्षित आहे. त्यामुळे युती तुटल्यावर शिवसेना आणि भाजपचे खासदार प्रथमच आमने-सामने येतील अशी शक्यता आहे.