शिवसेनेची मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
महापालिका आणि झेडपी निवडणुकीचा प्रचार संपला असला तरी भाजप-शिवसेनेतील सुंदोपसुंदी सुरूच आहे.
मुंबई : महापालिका आणि झेडपी निवडणुकीचा प्रचार संपला असला तरी भाजप-शिवसेनेतील सुंदोपसुंदी सुरूच आहे. आचारसंहिता सुरु असताना आणि प्रचार थांबलेला असताना मुख्यमंत्री खिशाला कमळाचं चिन्ह लावून मुलाखती देत आहेत. यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय.
यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असून सरकारी निवासात मुलाखतींचा धडाका लावल्याचाही आरोप त्यांनी केलाय.