मुंबई : राज्यात आणि केंद्रात पारदर्शी कारभार करा, असं सांगत भाजपाच्या 'पारदर्शी अजेंड्या'च्या मुद्द्यावर शिवसेनेनं पलटवार केलाय. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीला विरोधी पक्ष आणि पत्रकारांना आणून बसवा, अशी मागणी शिवसेना आमदार अनिल परब यांनी केली आहे.


नोटाबंदीचा निर्णय घेताना ही पारदर्शकता का बाळगली गेली नाही, असा सवालही त्यांनी केला आहे. दरम्यान युतीबाबत दुसरी बैठक उद्या दुपारी १ वाजता विनोद तावडेंच्या शासकीय निवासस्थानी होईल. आज मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पारदर्शी कारभाराबाबत निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव एकत्रित घेतील असं समजतंय.