मुंबई : मोफत 100 वडापावसाठी शिवसैनिकाने दुकानदाराला मारहाण केली आहे. विलेपार्ले पश्चिम येथील युवासेनेचा पदाधिकारी सुनील महाडीक यांनं तृप्ती फरसाण मार्टच्या मॅनेजर चेतन पटेल यांना १०० वडापावसाठी लाकडी बांबूनी मारहाण केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या शनिवारी 26 फेब्रुवारीला हा प्रकार घडला. विलेपार्ले पश्चिमच्या मैदानात बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं 'साहेब क्रिकेट चषकाचे' सामने भरवण्यात आले होते. या सामन्यांसाठी तृप्ती फरसाण मार्टच्या मालकानं १०० वडापाव मोफत दिले नाही यासाठी मॅनेजरला मारहाण केली गेली.


तृप्ती फरसाण मार्टचे मॅनेजर यांना कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुनील महाडिकवर जुहू पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून गुन्ह्याची नोंद करत पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.


एकीकडे शिवसैनिकांची चांगली कामं माध्यमांना दिसत नाही अशी टीका उद्धव ठाकरेंकडून होत असतांना शिवसैनिकांच्या दादागिरीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.