राज्य सरकारमधील युतीबाबत शिवसेनेची सध्याची भूमिका
शिवसेना-भाजप युती तुटली असली तरी सद्यास्थितीला सरकार अस्थिर होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांचे आदेश येताच, राज्यातले मंत्री राजीनामा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबई : शिवसेना-भाजप युती तुटली असली तरी सद्यास्थितीला सरकार अस्थिर होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांचे आदेश येताच, राज्यातले मंत्री राजीनामा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर युती तोडण्याची अधिकृत घोषणा केली. आगामी महापालिका तसंच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपशी युती होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या मेळाव्यात जाहीर केलं. त्यानंतर राज्यात सत्तेत सहभागी असलेली शिवसेना सरकारमधून देखील बाहेर पडणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. पण आगामी काळात शिवसेना काय भूमिका घेते यावर लक्ष लागून आहे.