शिवसेनेकडून थेट आता मुख्यमंत्र्यांना टार्गेट
शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर आता दोन्ही पक्षांमधील लढाई तीव्र झाली आहे. शिवसेनेने तर थेट आता मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या गृहखात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.
मुंबई : शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर आता दोन्ही पक्षांमधील लढाई तीव्र झाली आहे. शिवसेनेने तर थेट आता मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या गृहखात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून टीकेची झोड उठविणा-या भाजप खासदार किरीट सोमय्या यांचेच हात भ्रष्टाचाराने बरबरटलेले असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय. किरीट सोमय्यांनी पहिल्यांदा पारदर्शकता हा शब्द पहिल्यांदा बोलायला शिकावं आणि मग आम्हाला पारदर्शकता शिकवण्याचा सल्लाही खासदार राहूल शेवाळे यांनी दिला.