मुंबई : पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केलीय. जेटली यांना पत्र लिहून ही मागणी करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरोधात मोठा निर्णय घेत 500 आणि हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. 


या नोटा बदलण्यासाठी सामान्यांना 30 डिसेंबरची मुदत देण्यात आलीय. मात्र हा निर्णय जाहीर झाल्यानंतर सामान्यांचे दैनंदिन व्यवहार बिघडलेत. रोजच्या वस्तू खरेदी करणंही अवघड झालं. त्यामुळे लोकांचा व्यवहार सुरळीत व्हावा यासाठी शिवसेनेने जुन्या नोटा वापरण्याची मुदत वाढवण्याची मागणी केलीय.