मुंबई : राज्यात मागील वर्षी पडलेल्या दुष्काळाचा फटका ऊस उत्पादनाला बसणार असून राज्यात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घसरणार आहे. परिणामी भविष्यात साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे. कमी ऊस उत्पादन आणि आर्थिक अडचणीमुळे राज्यातील तब्बल 40 साखर कारखाने यंदा चालू होणार नाहीत असा साखर संघाचा अंदाज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतल्या झालेल्या निर्णय़ाचा शेतक-यांना कोणताच फायदा होणार नसल्याचं मत बाजार समितीच्या जाणकारांनी व्यक्त केलं आहे. मुंबईपासून दिल्लीपर्यंत बैठका घेऊन शेतकरीहिताच्या धोरणावर चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात कांदा उत्पादकांच्या झोळीत काय पडणार हे महत्त्वाचं आहे. 


मागील सलग तीन वर्ष राज्यात दुष्काळ होता. गेल्या वर्षी मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक होती.. या दुष्काळाचा फटका शेती उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर बसलाय.. राज्यात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र दुष्काळामुळे यंदाच्या हंगामात अनेक शेतकऱ्यांनी ऊसाकडे पाठ फिरवलीय. परिणामी राज्यात ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार आहे. ऊसाचे उत्पादन घटल्यामुळे राज्यातील साखर कारखाने अडचणीत येणार आहेत.


ऊसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम थेट साखरेच्या उत्पादनावरही होणार आहे. राज्यात प्रत्येक हंगामात साधारणतः 80 ते 85 लाख मेट्रीक टन साखर उत्पादन होते. मात्र दुष्काळामुळे ऊस उत्पादन घटल्याने राज्यातील साखर उत्पादन घटून ते 50 ते 55 लाख मेट्रीक टनावर येण्याची श्कात आहे. म्हणजेच 30 ते 35 लाख टन साखर बाजारात कमी असणार आहे. याचा थेट परिमाण साखरेच्या किंमती वाढण्यावर होणार आहे.


गेल्यावर्षी राज्यात 178 साखर कारखाने सुरू होते. मात्र 2016-17 च्या हंगामात यातील 30 ते 40 साखर कारखाने सुरूच होणार नाहीत. यात मराठवाड्यातील जास्त कारखान्यांचा समावेश असेल. मराठवाड्यात गेल्यावर्षी 40 कारखाने सुरू होते. मात्र यंदाच्या गाळप हंगामात यातील केवळ 5 ते 6 कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 40 टक्के साखर उत्पादन घटणार आहे. देशातील साखर उत्पादनावरही यंदा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी वर्ष हे ग्राहकांसाठी कडू ठरण्याची चिन्हं आहेत.