पाडव्यानिमित्त सिद्धीविनायक मंदिर मध्यरात्रीही भाविकांसाठी खुले
गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी. सिद्धिविनायक मंदिर मध्यरात्रीही भाविकांसाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
मुंबई : गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी. सिद्धिविनायक मंदिर मध्यरात्रीही भाविकांसाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
नववर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गुढीपाडव्याला सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी येतात. त्यामुळे मध्यरात्रीपासून मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
मंगळवारी २८ मार्चला गुढीपाडव्यानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर पहाटे दीड वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.