मुंबई : स्मार्ट शहरांची स्वप्न पाहाणाऱ्या भारतात इतर पायाभूत सुविधांबरोबरच इतर काही स्मार्ट गोष्टी अपेक्षित आहेत. अशाच एका स्मार्ट हॉटेलची निर्मिती मुंबईत झाली आहे. हॉटेलच्या एका खोलीत 14 लोक एकत्र राहू शकतात. अशा 50 ते 90 स्क्वेअर फूटचं हॉटेल बांधून तयार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ मोठ्या शहरांमध्ये सध्या रहाण्याच्या जागेची निर्माण होत चाललेल्या चंटाईवर एक स्मार्ट उपाय दोन उद्योजकांनी शोधून काढला आहे. 140 खोल्यांचे हे हॉटेल पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय रहाणार नाही.


द अर्बनपॉड म्हणजेच शहरी बंकर... जगातील कमीतकमी उपलब्ध जागेत जास्तीतजास्त लोकांना सामावून घेणा-या हॉटेल्सच्या यादीत या हॉटेलचा समावेश झाला आहे. सिंगल ऑक्युपेन्सी,प्राईवेट,फक्त महिलांसाठी असणा-या खोल्यांचा यात समावेश आहे. 
 
जपान, रशिया, अमेरिका, इंग्लंड, नेदरलॅँड, सिंगापूर आणि मलेशिया या सारख्या देशात अशी हॉटेल्स सर्सास पाहायला मिळतात. या अर्बनपॉ़डमध्ये असणा-या सर्व खोल्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. हॉटेलच्या उभारणीसाठी साधारण 12 कोटी रूपयांचा खर्च आला आहे. या खोल्यांमध्ये रहाण्यासाठी 2000 ते 2500 रूपये भाडं आकारण्यात येणार आहे. ज्यामध्ये सकाळची न्याहरीसुध्दा दिली जाईल.


या अर्बनपॉड सारखे अनेक पॉड देशभरात विविध शहरात सुरू आहेत,त्याचबरोबर या पॉडचं भाडही 1800 ते 1900 रूपये इतक कमी होणार आहे. सध्या ही सुरूवात आहे, मात्र येत्या काळात सर्वच मोठ्या शहरांमध्ये जागांच्या कमी होत जाणा-या समस्येवर हा उपाय़ 100% लागू पडेल अशी आशा आहे.