सोशल मीडियावर भाजपची शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी
युती तुटल्यावर आता भाजपनंही शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केलीय.सोशल मीडियावर शिवसेनेच्या 20 वर्षातल्या सत्तेवर टीका करणारी पोस्टर्स व्हायरल करण्यात येत आहेत.
मुंबई : युती तुटल्यावर आता भाजपनंही शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केलीय.सोशल मीडियावर शिवसेनेच्या 20 वर्षातल्या सत्तेवर टीका करणारी पोस्टर्स व्हायरल करण्यात येत आहेत.
वीस वर्षात मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचार आणि एकूणच कारभारावर या पोस्टर्समध्ये टीका करण्यात आलीय.
नळाच्या रांगेतल्या महिलांपासून तर कच-यांनी भरलेल्या नाल्यांपर्यंत सगळ्याला महापालिकेतले सत्ताधारी जबाबदार असल्याचा दावा भाजपनं केलाय..शिवाय हे चित्र बदलायचं असेल तर भाजपला एकहाती सत्ता देण्याचं आवाहनही या पोस्टर्समध्ये करण्यात आलंय.