मुंबई : शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या आणि कचरा टाकण्या-यांवर क्लिनअप मार्शलने चाप बसविण्यास सुरूवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील दीड महिन्यांत 60 हजार 967 लोकांकडून तब्बल 1 कोटी 34 लाख 92 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. बोरीवली परिसरात सर्वाधिक 18 लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आलाय. तीन वर्षांपासून बंद असलेल्या वादग्रस्त क्लीनअप मार्शलची योजना जुलैपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.


मुंबईतील रेल्वे स्थानकाच्या जवळ, पर्यटन ठिकाणी आदी परिसरात 700 हून अधिक मार्शल नियुक्त करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे, रस्त्याच्या बाजूला वाहने धुणे, उघड्यावर शौचास बसून परिसर अस्वच्छ करणा-या मुंबईकरांवर नजर ठेवण्यासाठी महापालिकेने क्लिनअप मार्शल सुरू केली आहे. दंडाच्या रक्कमेतील निम्मी रक्कम पालिकेच्या तिजोरीत तर उर्वरित कंत्राटदार संस्थांकडे जमा होणार आहे.