मुंबई : महाडच्या सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन एसटी बसेस वाहून गेल्या. रात्री साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सावित्री नदीच्या प्रवाहात या दोन्ही बसेस वाहून गेल्या होत्य.यातील काही जणांचे मृचदेह बाहेर काढण्यात यश मिळाले तर काहींचे अद्याप बेपत्ताच आहे. या दुर्घटनेमुळे प्रवाशांच्या मनात रात्रीच्या प्रवासाबाबत मोठी भिती निर्माण झालीये. 


याचा परिणाम कोकण मार्गावर एसटीमधून रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटलीये. रात्रीच्या वेळी ट्रॅफिकचा त्रास सतावत नाही. त्यामुळे अनेक जण रात्रीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. मात्र महाड दुर्घटनेनंतर रात्रीऐवजी दिवसा प्रवासाला प्रवाशांची पसंती मिळतेय. 


यामुळे एसटीच्या उत्पन्नावर याचा परिणाम झालाय. प्रवाशांची संख्या निम्म्याने घटल्याने गेल्या १५ दिवसांमध्ये १५ टक्के घट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.