`गुलाबराव पाटील यांच्या फटक्यांसाठी गिरीश महाजनांचा खर्च`
विधान परिषदेचे सभापती म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांची फेरनिवड झाली. त्यानंतर निंबाळकर यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली. त्याचवेळी एकनाथ खडसेंवरून जोरदार टोलेबाजी झाली आणि सभागृहात हशा पिकला.
मुंबई : विधान परिषदेचे सभापती म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांची फेरनिवड झाली. त्यानंतर निंबाळकर यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली. त्याचवेळी एकनाथ खडसेंवरून जोरदार टोलेबाजी झाली आणि सभागृहात हशा पिकला.
सभागृह नेतेपदी चंद्रकांत पाटील
सभापतीपदाचा उमेदवार ठरवण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसने बैठक बोलावली होती. यासाठी सुनील तटकरे आणि हेमंत टकले यांच्या नावाची चर्चा होती. मात्र बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव निश्चित झाले. तर दुसरीकडे एकनाथ खडसेंच्या जागी सभागृह नेतेपदी चंद्रकांत पाटील यांची निवड झाली.
गुलाबराव पाटील यांचे फटाके
दरम्यान, निंबाळकर यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली. त्यानंतर अभिनंदन प्रस्ताव सुरू असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर गुलाबराव पाटील यांनी जळगावात फटाक्याच्या माळा लावल्या. त्या टीव्हीवर दिसल्या. मात्र या सर्व फटाक्यांचा खर्च गिरीश महाजन यांनी केला होता, अशा शब्दांत तटकरेंनी भाजपला टोले लगावले.
त्यांना आईची आठवण
दरम्यान, सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर यांच्या गळ्यात प्रथमच मंत्रीपदाची माळ पडली. तर राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली. यावेळी खोत आणि जानकर यांच्या आईनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर राम शिंदे यांनीही आपल्या आईची आठवण काढली.