मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची गुडन्यूज राज्य शासनाने दिली आहे. दिवाळी आधीच ऑक्टोबर महिन्याचा पगार हातात मिळणार आहे. तसेच महागाई भत्‍त्‍याची थकबाकी रोखीने मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्‍ट 2016 यादरम्यानची महागाई भत्‍त्‍याची थकबाकी रोखीने देण्‍याचा निर्णय वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. राज्‍य शासनाच्‍या वित्‍त विभागाने दिनांक 20 ऑक्‍टोबर 2016 रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.


राज्‍य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीक कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्‍त्‍याचा दर 119 टक्‍क्‍यावरून 125 टक्‍के करण्‍यात आला आहे. तसेच 1 सप्‍टेंबर 2016 पासून या महागाई भत्‍त्‍याच्‍या वाढीची रक्‍कम रोखीने देण्‍यात आली आहे. 


20 ऑक्‍टोबर 2016 च्‍या शासन निर्णयान्‍वये दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्‍ट 2016 या कालावधीतील महागाई भत्‍त्‍याच्‍या थकबाकीची रक्‍कम रोखीने देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.  दरम्यान, ऑक्‍टोंबर महिन्‍याचे वेतन व निवृत्‍तीवेतन दिवाळीपूर्वी करण्‍याचे निर्देश आगामी दिवाळीचा सण विचारात घेवून ऑक्‍टोबर 2016 या महिन्‍याचे वेतन व भत्‍त्‍यांचे वितरण दिनांक 25 ऑक्‍टोबर 2016 पूर्वी करण्‍याचे निर्देश वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.


याबाबत वित्‍त विभागाने दिनांक 20 ऑक्‍टोबर 2016 रोजी स्‍वतंत्र परिपत्रक निर्ममित केले आहे. त्‍याचप्रमापणे राज्‍यातील राज्‍य शासकीय निवृत्‍ती वेतन धारकांना तसेच कुटूंब निवृत्‍ती वेतन धारकांना ऑक्‍टोबर 2016 या महिन्‍याचे निवृत्‍ती वेतन दिनांक 25 ऑक्‍टोबर 2016 पूर्वी प्रदान करण्‍याचे निर्देशही या परिपत्रकाद्वारे दिले आहेत.