कमी दरात राज्य सरकार देणार तुरडाळ
तुरडाळ आता 95 रुपये किलो दराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये खुल्या बाजारात आता 95 रुपये किलो दराने तुरडाळ उपलब्ध करून देण्याचा सुधारित निर्णय शासनानं घेतलाय. पण 95 रुपये किलो दराने तुरडाळ विक्रीच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार, हा खरा प्रश्न आहे.
मुंबई : तुरडाळ आता 95 रुपये किलो दराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये खुल्या बाजारात आता 95 रुपये किलो दराने तुरडाळ उपलब्ध करून देण्याचा सुधारित निर्णय शासनानं घेतलाय. पण 95 रुपये किलो दराने तुरडाळ विक्रीच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार, हा खरा प्रश्न आहे.
याआधी तूरडाळ 120 रुपये किलो दरानं उपलब्ध करुन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याचबरोबर फक्त चार जिल्ह्यातल्या नागरिकांनाच स्वस्त तूरडाळ का, असा प्रश्नही विचारला जातोय. सध्या बाजारात 180 ते 200 रुपयांनी तूरडाळ विकली जातेय.