मुंबई :  मुंबईतील लोकल ट्रेन मध्ये मस्ती करणे एका अल्पवयीन मुलाला चांगलेच महागात पडले आहे. एक व्हिडिओ झी मीडीयाच्या हाती लागला असून यांत लाल शर्ट घातलेला एक अल्पवयीन मुलगा चालू लोकल ट्रेन मध्ये स्टंट करतोय.


पाहा व्हिडिओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


२३ सेकंदाचा हा व्हिडिओ .... लाल शर्ट घातलेला हा मुलगा ... चालू ट्रेन मध्ये करतोय स्टंट... याच वेळी ट्रेन मधील एक प्रवासी या लाल शर्ट घातलेल्या मुलाचे स्टंट मोबाईल मध्ये शूट करत होता.... त्याचवेळी अचानक ........ लाल शर्ट घातलेला तो मुलगा एका खांबाला धडकतो .... आणि कोसळून खाली पडतो ... ही घटना मुंबईतील पश्चिम रेल्वेची आहे.... 


 
 चर्नी रोड ते मरीन लाईन्स दरम्यान काही अल्पवयीन मुलं रेल्वेतून प्रवास करत होती. यावेळी ही मुलं आपल्या जिवाशी खेळ करत स्टंट बाजी करत होती. त्यापैकी एक लाल शर्ट घातलेला मुलगा ट्रेन मध्ये स्टंट करत असताना समोरुन येणारा लोखंडी खांब त्याला दिसला नाही आणि तो त्या खांबाला धडकला... त्याचे काय झाले असेल त्याचा अंदाज तुम्हीच लावा.
 
 चर्नीरोड जीआरपी ने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.... हा व्हिडिओ कधीचा आहे त्याचा तपास आता पोलीस करतायेत.