राज्यात साखर आठ रूपयांनी महागली
राज्यातील साखर उत्पादन दुष्काळामुळे घटणार आहे, तसेच निर्यातीसाठी केंद्र सरकारने सक्ती केल्याने बाजारपेठेतील साखरेच्या दरात वाढ होत आहे.
मुंबई : राज्यातील साखर उत्पादन दुष्काळामुळे घटणार आहे, तसेच निर्यातीसाठी केंद्र सरकारने सक्ती केल्याने बाजारपेठेतील साखरेच्या दरात वाढ होत आहे.
घाऊक बाजारात गेल्या आठ दिवसांत प्रति क्विंटल ७० ते ८० रुपयांची वाढ झाली आहे.
किरकोळ बाजारात साखर ७ ते ८ रुपयांनी महाग होण्याची चिन्हे आहेत. बाजारातील मागणी आणि उत्पादन पाहता साखर ३ हजारांवर स्थिरावेल असा अंदाज आहे.
हंगामाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने एकूण उत्पादनाच्या १२ टक्के निर्यात कोटा दिल्याने त्याचा परिणामही बाजारपेठेवर झाला.
यंदाचा साखर हंगाम सुरू होण्यापूर्वी साखरेच्या दराने आतापर्यंतचा नीचांक गाठला होता. त्यानंतर प्रत्येक महिन्याला साखरेच्या दरात थोडी थोडी वाढ होत गेली.