राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती
राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती करण्यात आलीय. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीच्या आदेशावर सह्या केल्या
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती करण्यात आलीय. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीच्या आदेशावर सह्या केल्या.. मलिक १९८२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून सध्या ते राज शिष्टाचार आणि सामान्य प्रशासन विभागच प्रमुख म्हणून काम करत आहेत.
विद्यमान मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांचा कार्यकाळ आज संपणार आहे. क्षत्रिय ३१ जानेवारी २०१७ रोजी सेवा निवृत्त होणार होते. पण निवडणुकीचा कालावधी असल्यानं त्यांना महिन्याभराची मुदतवाढ देण्यात आली होती. सुमित मलिक यांनी याआधी अमरावती विभागाचे आयुक्त, शिक्षण विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहिलं आहे.