मुंबई :  उष्माघातापासून नागरिकांच्या बचावासाठी शासकिय स्तरावर उपाय योजना करण्यासंदर्भातील आदेश सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत. भारतीय हवामान खात्याने चालू वर्षी उन्हाळ्याची तीव्रता सर्वाधिक असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही खबरदारी घ्या
१) सूती कपड्यांचा वापर वाढवणे.
२) घरा बाहेर पडताना गॉगल्स, छत्री, टोपी, आदींचा प्रमुख्याने नागरिकांनी वापर करावा. 
३) शरिरातील पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी लस्सी, लिंबू पाणी, ताक आदींचे सेवन करावे.
४)  गुरांना छावणीत ठेवणे आदी उपाय सुचवले आहेत.


खालील गोष्टी टाळा
५) लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या आणि पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. 
६) दुपारी 12 ते 3.30 या काळात घराबाहेर पडणे टाळावे, तसेच यावेळेत शाररिक कामे टाळावित.
७) उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गृहिणींनी मोकळ्या हवेतील स्वयंपाक घराची दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात, आदी सूचना दिल्या आहेत.


यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याची सुरुवात लवकर झाली आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी परिपत्रक काढून दिले आहेत.


शासकिय स्तरावर करावयाच्या उपाय योजनांमध्ये उष्णतेच्या लाटेची माहिती देण्यासाठी प्रसार माध्यमांचा वापर करणे, जागोजागी पाणपोई उभारणे, उन्हापासून संरक्षणासाठी रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी शेड उभारणे, जिल्हा नियंत्रण कक्ष, महानगरपालिका नियंत्रण कक्ष, विभागीय स्तरावरील नियंत्रण कक्ष व स्थानिक संस्था आणि आरोग्य विभागाने एकत्रित कार्य करणे. तसेच उष्माघातापासून बचावाबाबत जनजागृती कार्यक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.