मुंबई : मुंबई विद्यापीठातील भोंगळ कारभाराच्या बातम्या सतत पाहायला मिळत असतात. सोमवारही यात आणखी एका प्रकरणाची भर पडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएमएमच्या एका विद्यार्थिनीच्या पदवी प्रमाणपत्रात तिच्या आडनावाचे चक्क भाषांतर करण्यात आले. nikita kite या नावाच्या विद्यार्थिनीचे नाव मराठीत लिहिताना चक्क निकिता पतंग असे लिहिण्यात आले. परीक्षा विभागाच्या या कारभाराने सगळेच अवाक झाले.


नुकताच मुंबई महाविद्यापीठाचा दीक्षांत समारंभ झाला. यावर्षी विद्यापीठाने १६०व्या वर्षानिमित्त नव्या पदवी प्रमाणपत्रांची छपाई केली. या पदवी प्रमाणपत्रात बीएमएमच्या एका विद्यार्थिनीच्या आडनावाचे चक्क भाषांतरच करण्यात आले. 


रुईया कॉलेजमधील निकिता काटे हिेचे इंग्रजीतील स्पेलिंग nikita kite असे  आहे. मात्र प्रमाणपत्रावर मराठीत हे नाव लिहिताना निकिता पतंग असे लिहिण्यात आले. आपले बदलेले आडनाव वाचून निकितालाही धक्काच बसला. याप्रकऱणी ट्विटरवरुन तिने नाराजी व्यक्त केलीये.