मुंबई : छोट्या पड्द्यावरील झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेद्वारे प्रसिद्धी झोतात आलेली जोडी अंकिता लोखंडे आणि सुशांत रजपूत विवाहबद्ध होणार होती. मात्र, त्यांचे ब्रेकअप झाल्याची माहिती पुढे आलेय. लग्न होण्यासाठीच ही जोडी वेगळी झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकिता आणि सुशांत लिव्ह-इनमध्ये राहत होते. त्यांनी लग्नाचा विचार केला आणि घराचाही शोध घेतला. मात्र, माशी कुठे शिंकली कोणास ठावूक, लग्न होण्यासाठीच ब्रेकअपची वाईट बातमी पुढे आली.'पवित्र रिश्ता' या टीव्ही मालिकेद्वारे पुढे आलेली जोडी. खर तर, दोघांचे प्रेमप्रकरण रंगले तेव्हा अंकिता लोकप्रियतेच्या निकषावर सुशांतच्या अनेक पुढे होती. ती छोट्या पडद्यावरची मोठी स्टार झाली, पण तिथेच रमली, राहिली. तर सुशांतने छोटा पडदा सोडला आणि मेगास्टार बनला.


 


२७ वर्षांचा सुशांत मुळचा पाटण्यातला. त्याचे वडील सरकारी बाबू. इंजिनियरिंगच्या entrance exam मध्ये तो भारतातून सातवा आलेला. म्हणजे तल्लख बुद्धीचा म्हणायला हवा. दिल्लीच्या इंजिनियरिंग कॉलेजात त्याने प्रवेश घेतला. तीन वर्षं तिथे घालवली. त्यानंतर थेट मुंबई गाठली. तिथेच या बिहारी बाबूला मराठी मुलगी भेटली. अंकिता ही मध्यप्रदेशमधील भोपाळची. दहा वर्षांपूर्वी झी Cine Stars की खोज या  reality talent शो मधून अंकिताने पदार्पण केले.


परिणीती, कतरिना कैफसारख्या टॉपच्या अभिनेत्रींनबरोबर त्याला चित्रपट मिळालेत, तरी यशाचा कैफ सुशांतला चढलेला नव्हता. मात्र, सुशांत कारकीर्दीच्या या वळणावर अंकिताच्या बराच पुढे निघून गेलाय. 'काई पो चे' नंतर तो कुठल्या कुठे जाऊन पोहोचलाय. सुशांतने चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमावण्याचे ठरविले आणि आपल्या पहिल्याच चित्रपटाने त्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले.


सुशांत आणि अंकिता गेल्या चार वर्षांपासून आम्ही 'लिव्ह-इन रिलेशनशीप'मध्ये राहात होते. या प्रेमसंबंधांना पुढे नेण्यासाठी विवाह करण्याचा निर्णय घेतलाय.