मुंबई : राज्यातल्या शेतकऱ्याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणारे शेतकरी विजय जाधव यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जाधव विधानभवनाच्या गेटवर निदर्शन करणार होते. मात्र या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून विजय जाधव यांना मध्यरात्री ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जाधव यांचं आझाद मैदानात पोलिसांच्या देखरेखीत आंदोलन सुरु आहे. 


शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी विजय जाधव मुंबईत दाखल झालेत. नाशिक इथं शिवसेनेच्या शेतकरी अधिवेशनातही विजय जाधव अस्थी कलश घेऊन सहभागी झाले होते. दरम्यान विजय जाधव यांना ताब्यात घेतल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातही उपस्थित करण्यात आला. या मुद्यावरुन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारवर टीका केली.