ISISमध्ये सहभागी झालेल्या तरबेजची एटीएसच्या हाती मोठी माहिती
जागतिक अतिरेकी संघटना ISIS (आयसिस)च्या क्रूर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी 28 वर्षीय तरूण तरबेज नूर मोहम्मद तांबे गेला होता. याप्रकरणी तपास करीत असलेल्या एटीएसच्या हाती मोठी माहिती लागली आहे.
मुंबई : जागतिक अतिरेकी संघटना ISIS (आयसिस)च्या क्रूर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी 28 वर्षीय तरूण तरबेज नूर मोहम्मद तांबे गेला होता. याप्रकरणी तपास करीत असलेल्या एटीएसच्या हाती मोठी माहिती लागली आहे.
तबरेज नूर मोहम्मद तांबे याने भारत सोडण्या पुर्वी त्याच्याच भावाच्या अकाऊंट जवळपास ६ लाख रुपये रक्कम जमा केली होती. मुंबई ते काइरो, काइरो ते दार-ए-सलाम रिटर्न आणि कायरो ते खार्तूम रिटर्न अशी विमान तिकिटे बुक केली होती.
त्यामुळे तबरेजकडे एवढी मोठी रक्कम आली कशी? सौदीच्या अलीशी तो किती दिवसांपासून संपर्कात होता? अलीशी आणखी किती जण संपर्कात होते आणि आहेत? तबरजे ने हे सगळे व्यवहार कसे केले या सर्व गोष्टींची चौकशी एटीएस करत आहे. त्याकरिता तबरजेच्या रत्नागिरीतील गावी देखील एटीएस तपास करत आहेत.