मुंबई : टाटा सन्सच्या प्रमुख पदावरून उचलबांगडी झाल्यावर आज टाटा समूहाच्या शेअर्समध्ये पडझड बघायला मिळतेय. समूहाचे शेअर्सच्या किंमतीत तीन ते चार टक्के घसरण बघायला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान  सायरस मिस्त्रीं आज निर्णयला कोर्टात आव्हान देण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शापुरजी पिलोंजी मिस्त्री समूह राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडेही या निर्णयासंदर्भात तक्रार करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.


इकडे रतन टाटांनी टाटा समूहातल्या सगळ्या सीईओंची तातडीची बैठक मुंबईत बोलावलीय.  या बैठकीत  टाटा समूहातल्या मीठा पासून सॉफ्टवेअर पर्यंत आणि कॉफीपासून कारपर्यंत सगळ्या उद्योगांचे प्रमुख उपस्थित राहाणार आहेत. सायरस मिस्त्रींना तडकाफडकी हटवल्यानं आज शेअर बाजारावरही परिणाम दिसतोय.