मुंबई:  महिलांसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबईत एका परदेशी महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. सहा महिन्यांपूर्वी 32 वर्षाची इटालियन महिला मुंबईत आली होती. पण त्या महिलेला मुंबईचे रस्ते आणि ठिकाणांची अजून माहिती नसल्यामुळे बुधवारी रात्री 11 वाजता तिने पालीहिल वरुन सात बंगल्याला जाण्यासाठी उबेर टॅक्सी बुक केली. त्या उबेर टॅक्सीतून जाताना रहदारी नसलेली जागा पाहून त्या उबेर टॅक्सीच्या ड्रायव्हरने परदेशी महिलेचा विनयभंग केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेचा खुलासा पीडित परदेशी महिलेच्या एका मैत्रीणीने फेसबूकद्वारे गुरूवारी केला. पीडित महिलेच्या मैत्रीणीने खार पोलीस स्थानकात तक्रार करणयाचा प्रयत्न केला पंरतू त्यांना सांताक्रूज पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले. तिथे उबेर टॅक्सीच्या ड्रायव्हरविरोधात तक्रार नोंदविल्यानंतर 12 तासात त्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली.


आरोपीचे नाव शहबाज अब्दुल सत्तार शेख आहे. आरोपीने पोलिसांना सांगितले, मला माहित होते की ती महिला परदेशातील आहे आणि तिला मुंबईची जास्त माहिती नाही. या पूर्ण घटनेचा खुलासा होताच उबेर कंपनीतूनही त्या आरोपी ड्रायव्हरला सस्पेंड करण्यात आलं आहे.