मुंबई : सर्वांच्या कुतुहलाचा विषय असलेली तेजस एक्स्प्रेस आज धावणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखवताच, मुंबई येथून ‘तेजस’ करमळीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ‘तेजस’मध्ये एक्झिक्युटिव्ह बोगीत ५६ सीट आणि एसी बोगीत ९३६ सीट आहेत. प्रत्येक डब्यात ६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.‘तेजस’ एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना अल्पोपहाराची सेवा पुरवण्यात येणार आहे.


 IRCTC कडून ही सेवा सशुल्क देण्यात येणार आहे. ‘तेजस’मध्ये सायंकाळच्या अल्पोपहारात दाबेली, डाएट चिवडा, सामोसा, कोथिंबीर वडी मिळणार आहे. सकाळी ब्रेड बटरसह उपमा, पोहे, इडली, वडा मिळणार आहे.


नथुराम गोडसेचं स्मारक आणि पुतळा उभारण्याच्या मुद्यावरुन विधान परिषदेत जोरदार गदारोळ झाला. कल्याणच्या सापड गावात हिंदू महासभेद्वारे हे स्मारक उभारण्यात येणार आहे. 


हे स्मारक उभारण्यासाठी जागा घेतली असून ते प्रत्यक्षात आल्यास पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लागेल असं काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी म्हटलं. संजय दत्त यांनी दिलेल्या माहितीची चौकशी करण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय.