मुंबई : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी वेगवान अशी तेजस ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती. या गाड्या आजपासून धावत आहेत. तसेच मेल-एक्स्प्रेसचे नवे वेळापत्रक लागू होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार आज १ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सोईनुसार मेल-एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात येत असल्याची माहिती पश्चिम-मध्य रेल्वेकडून देण्यात आली. त्याचप्रमाणे नवीन ट्रेनही चालवण्यात येणार आहेत.


पश्चिम रेल्वेवर अंत्योदय, उदय, हमसफर आणि संकल्प रेल्वे तर मध्य रेल्वेवर सीएसटी ते करमाळी दरम्यान वेगवान अशी तेजस गाडी चालवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर दादर ते डहाणू दरम्यान १४ डेमूऐवजी लोकल चालवण्यात येणार आहे.


नवीन गाड्यांचे वेळापत्रक


मध्य रेल्वेवरील सीएसटी ते करमाळी तेजस एक्सप्रेस ही आठवड्यातून पाच दिवस धावेल. ट्रेन नंबर11209  सीएसटी येथून 00.20 वाजता सुटून करमाळी येथे 11.00 वाजता पोहोचेल. तर ट्रेन नंबर 11210 करमाळी येथून 12.20 वाजता सुटून सीएसटी येथे त्याच दिवशी 22.45 वाजता पोहोचणार आहे. गाडीला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, थिविम येथे थांबा देण्यात आला आहे. 


मनमाड-सीएसटी पंचवटी एक्सप्रेस 6.10 च्या ऐवजी 6.02 वाजता सुटेल. एलटीटी-भुवनेश्वर आणि सीएसटी ते लातूर एक्सप्रेसला ठाणे स्थानकातही थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.